spot_img
spot_img
spot_img

१ ऑगस्ट ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून घोषित करा ; आ. अमित गोरखे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त, दिनांक १ ऑगस्ट हा ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्याची मागणी आमदार अमित गोरखे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पुणे येथे झालेल्या खंड प्रकाशन कार्यक्रमात केली. अण्णाभाऊंच्या लेखनाचे व्यापक सामाजिक महत्त्व अधोरेखित करत आमदार गोरखेंनी सांगितले की, “अण्णाभाऊंचे साहित्य हे केवळ शब्द नव्हते, ते होते अन्यायाविरुद्धचा हुंकार,आणि समाज परिवर्तनासाठीची मशाल!”

अण्णाभाऊ साठे यांचे लेखनकार्य त्यांनी ३५ हून अधिक कादंबऱ्या, १५० हून अधिक ललित साहित्य प्रकार, हजारो पोवाडे, लोकनाट्य आणि गीते, तसेच ‘फकिरा’ सारखी क्रांतीकारी कादंबरी लिहून मराठी साहित्याला नवा सामाजिक आणि श्रमिक वर्गाचा चेहरा दिला. आमदार गोरखेंनी अधोरेखित केले की अण्णाभाऊ साठेंचे साहित्य मूलतः वंचित, शोषित, कामगार, तमाशा लोकांच्या जीवनाशी नाळ जोडणारे होते. त्यांच्या लेखणीतून दलित समाजाचे वास्तव शब्दबद्ध झाले.

“जे आज सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत, तसेच नव्या पिढीतील प्रत्येक तरुण, विद्यार्थी, विचारवंत, लेखक यांना अण्णाभाऊ साठे यांच्या लेखनाचा अभ्यास करता यावा व त्यांच्या लेखणीतून प्रेरणा मिळावी, यासाठी शासनाने हा दिवस लेखन प्रेरणा दिन म्हणून घोषित करावा,” असे आवाहन गोरखेंनी केले.

“अण्णाभाऊ साठे यांची लेखणी म्हणजे सामाजिक परिवर्तनाचे अस्त्र आहे. ही लेखनसंपदा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे ही शासनाची जबाबदारी आहे, आणि लेखन प्रेरणा दिन ही त्या दिशेने होणारी एक विधायक सुरुवात ठरेल,” असा ठाम विश्वासही आमदार अमित गोरखे यांनी व्यक्त केला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!