spot_img
spot_img
spot_img

Thergaon : महिलांसाठी मनीषा पवार यांचा उल्लेखनीय उपक्रम !

स्कुटी शिका व स्वावलंबी व्हा…

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका तथा मा. शिक्षण समिती सभापती मनीषा प्रमोद पवार यांच्या वतीने तसेच चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली “स्कूटी शिका व स्वावलंबी व्हा” हा उल्लेखनीय उपक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती माजी नगरसेविका मनीषा पवार यांनी दिली.

या उपक्रमात 50% सवलतीच्या दराने महिलांसाठी स्कुटी शिकविण्यात येणार आहे. याकरिता नाव नोंदणी करण्यासाठी मनीषा पवार यांचे कार्यालय स्वामी विश्व अपार्टमेंट, गणेश मंदिरासमोर, भोरडे नगर येथे नोंदणी सुरू आहे. सदर नोंदणी 20 ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार आहे, या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करून फक्त बाराशे रुपये फी भरून महिलांना स्कुटी शिकविण्यात येणार आहे.

याबाबत मनीषा पवार यांनी म्हटले आहे की, ‘सदर उपक्रम महिलांसाठी राबविण्यात येत आहे. महिलांना स्वावलंबी करण्याकरिता हा छोटासा प्रयत्न करण्यात येणार आहे. ज्यांनी कधी सायकल चालवली नाही, ज्यांची उंची कमी आहे, गाडी चालवण्यास भीती वाटते व ज्यांचे वय 18 ते 50 दरम्यान आहे, अशा सर्व महिलांसाठी 50% सवलतीच्या दराने स्कुटी शिकविण्यात येणार आहे.” तरी जास्तीत जास्त महिलांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मनिषा पवार यांनी केले आहे.

सदर उपक्रमात सहभागी होण्याकरिता या संपर्क क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!