पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील एक कर्मचारी एका व्यक्तिकडून पैसे घेण्याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. माहिती घेतली असता लेखा विभागातील सदर व्हिडिओ असून यामुळे महानगरपालिकेतील चुकीच्या कामाबाबत शहरात चर्चा सुरू आहे. या तील दोषी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हाटकर यांनी केली आहे.
आयुक्त शेखर सिंह यांच्या कार्यकाळात पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना अनेक पुरस्कार मिळाले. गतिमान आणि भ्रष्ट कारभार विरहित प्रशासन असा डंका आयुक्त यांच्या मार्फत वाजविण्यात आला. आयुक्त शेखर सिंह यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका भ्रष्टाचार मुक्त करण्याचे आश्वासन दिलेले होते. प्रशासकीय राजवटीत अनेक चुकीच्या गोष्टी, वाढीव दराच्या निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्या यावर अनेकदा वर्तमानपत्रांनी आवाज उठवला पण काल पिंपरी चिंचवड महानगरपालिका मधील लेखा विभागातील पैसे घेण्याबाबत जो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्याने प्रशासकीय राजवटीत कसे चुकीचे काम होते ते अधोरेखित केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका लेखा विभागात अशा गोष्टी नेहमीच घडत असतात. मनपा चे काम करणाऱ्या ठेकेदारांची देयके काढण्याचे काम या विभागामार्फत केले जाते त्यामुळे येथे नेहमीच ठेकदार यांची वर्दळ असते. या विभागात विभाग प्रमुख , लिपिक , शिपाई तसेच कंत्राटी कर्मचारी हे अनेक वर्षापासून येथे कार्यरत असल्याने त्यांना कोणाचेही भय नाही आहे. आपल्या लेखा विभागात पैसे घेऊन कामे केले जातात एकही बिल विना पैशाचे पास केले जात नाही शिपायापासून ते बिल मंजुरीचा चेक देणाऱ्या अधिकाऱ्यांपर्यंत सगळेच चिरीमिरी पैसे घेतात आणि हे सगळं सगळ्यांना माहिती असून सगळे गप्प आहेत. कारण माहिती नाही का ? पण जो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्याने ह्याचा पुरावा जनतेसमोर आणला आहे. त्या व्हिडिओमध्ये एक कर्मचारी पैसे घेताना सरळ दिसत आहे असे असताना देखील २ दिवस होऊन सुद्धा विभाग प्रमुख यांच्याकडून सदर कर्मचारी याचा शोध लावून त्यावर कारवाई करण्यात आली नाही. अथवा एक जबाबदार प्रशासकीय अधिकारी म्हणून आयुक्त शेखर सिंह साहेब अथवा अती आयुक्त अथवा वरिष्ठ अधिकारी यांच्या कडून सदर कर्मचारी अथवा विभाग प्रमुख यांना जाब विचारला जात नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे.
सदर व्हिडिओ यांची चौकशी करून पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या वतीने याचा खुलासा करण्यात यावा तसेच संबंधित कर्मचारी तसेच विभाग प्रमुख यांच्यावर कारवाई करण्यात यावी. आणि मुख्य म्हणजे लेखा विभागात अनेक वर्षापासून पदोन्नतीने एकाच पदावर , एकाच जागेवर अनेक अधिकारी, कर्मचारी काम करीत असल्याने येथे त्यांची मनमानी चालत आहे. एकही बिल अथवा फाइल पैसे घेतल्या शिवाय पुढे जात नाही आहे. त्यामुळेच गैर व्यवहारचे असे प्रसंग घडत आहेत. शासकीय नियमानुसार एक अधिकारी अथवा कर्मचारी ३ वर्षाहून जास्त काळ एकच ठिकाणी कार्यरत राहू शकत नाही असा शासकीय नियम असताना मग पिंपरी चिंचवड महानगरपालिका लेखा विभागात असे अनेक अधिकारी , कर्मचारी, लिपिक , शिपाई आहेत जे गेल्या अनेक वर्षापासून येथेच काम करतात. काहीना पदोन्नती देऊन एकाच जागेवर ठेवण्यात आलेले आहे. तर काही बदली केलेल्या कर्मचारी यांची बदली रद्द करून पुन्हा त्यांना त्याच ठिकाणी पुन्हा रुजू करण्यात आले. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी , लिपिक, शिपाई हे येथेच अनेक वर्षापासून कायम कार्यरत असल्याने त्यांचे आणि ठेकदार यांचे आर्थिक हित संबंध तयार झाले आहे. विशेष बाब म्हणजे लेखा विभागातील महिला कर्मचारी सुध्दा आर्थिक देवाणघेवाण करतात. अशा चुकीच्या प्रकारातून अशा घटना घडत आहे ज्या महानगरपालिका यांच्या नावाला बट्टा लावण्याचे काम करीत आहे. प्रशासकीय राजवटीत आयुक्त साहेब आपण जबाबदार प्रशासकीय अधिकारी असल्याने सदर प्रकरणाचे गांभीर्य आपण लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिका लेखा विभागातील पदोन्नतीने एकाच पदावर अनेक वर्षापासून काम करीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची त्वरीत बदली करण्याचे आदेश द्यावेत आणि सदर व्हिडिओ यांची चौकशी करून त्यांच्यातील दोषी अधिकाऱ्यांवर आणि दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी राहुल कोल्हाटकर यांनी केली आहे.