पिंपरी चिंचवड शहरातील केशवनगर,विवेक वसाहत चौक,उद्यम विकास बँक समोर दोन महिन्यात तीन वेळा चेंबर चे काम झाले परंतु तीन हि वेळा हे चेम्बर फुटले किंवा खराब झाले आहे.पाच महिन्यापूर्वी मोठा खर्च करून या ठिकाणी काम केले परंतु मुख्य रस्ता,वर्दळ मोठी मग एवढ्या हलक्या दर्जाचे काम करून लोकांच्या जीवाशी खेळ केला जातोय.विशेष म्हणजे हे चेंबर रस्त्याच्या मधोमध व मोठ्या वर्दळीच्या ठिकाणी आहे.
महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे यांनी याआधी वारंवार पाठपुरावा केला आहे पण कामाचा दर्जा आहे तसाच खराब आहे. चार दिवस झाले हे तिन्ही चेंबर खराब झाले आहेत किमान 10/15 दुचाकी चालक पडून अपघात झाले आहेत.याला जबाबदार कोण?आज किंवा उद्या चेंबर खाली जाऊन चारचाकी सुद्धा त्यात फसू शकते.
या आधी तक्रार झाल्या तर असे निकृष्ठ दर्जाचे चेंबर बसविले.समंधित अधिकारी ठेकेदार यांच्यावर कारवाई झाली पाहिजे पण तसे होत नाही पालिकेचा पैसा नाहक वाया जातोय व नागरिकांना अपघातास सामोरे जावे लागतय.याची गंभीर दखल घेतली पाहिजे अन्यथा पुढच्या वेळी समंधित अधिकाऱ्यास नागरिकांकडून नक्की शासन होणार याची प्रशासनाने नोंद घ्यावी अशी मागणी मधुकर बच्चे यांनी केली आहे