spot_img
spot_img
spot_img

पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड

पिंपरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांकडून, कार्यकर्त्यांकडून कौतुकांचा वर्षाव व शुभेच्छांचा पाऊस

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा काल (बुधवार) शेवटचा दिवस होता.कालच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू होती. हे अधिवेशन अनेक कारणांमुळं गाजलं. सामान्य लोकांच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा इतर मुद्दे या अधिवेशनात चर्चेत आले.त्याच प्रमाणे अजून एक महत्वाचा विषय तो म्हणजे विधानसभा उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचे) अण्णा दादू बनसोडे यांची बिनविरोध आणि एकमतानं झालेली निवड…

“विधानसभा उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची निवड झाली.त्याबद्दल मी त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो. बनसोडे यांनी बराचकाळ समाजकारण, राजकारणात काम केलं आहे.महानगरपालिका नगरसेवक ते आमदार आणि आता विधानसभा उपाध्यक्षपदी असा त्यांचा प्रवास हा नक्कीच अभिमानास्पद असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि अण्णा बनसोडे या दोघांच्या समन्वयातून या सभागृहाला निश्चितपणे न्याय मिळेल”, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.तसेच पुढं म्हणाले की, “महाराष्ट्र विधानमंडळाला फार मोठी परंपरा आहे. या गौरवशाली परंपरेला पुढं नेण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. भारताचं संविधान किती मोठं आहे. सामान्यातल्या सामान्य माणसाला देखील मोठ्या पदावर जाण्याची संधी मिळते. संधीची समानता हे संविधानामुळं मिळाली आहे. आज पाहू शकतो की,चहा टपरीवर काम करणारे पंतप्रधान झाले. ऑटो रिक्षा चालवणारे राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि एक पान टपरीवाले राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष झाले आहेत” असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी अण्णा बनसोडे यांचं कौतुक केलं आहे.

यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अण्णा बनसोडे यांचं अभिनंदन केलं. दरम्यान, यावेळी २०१९ विधानसभा निवडणुकीत अण्णा बनसोडेंना पक्षाकडून एबी फॉर्म आपण कसा दिला.याबद्दल मजेशीर किस्सा अजित पवारांनी सभागृहात सांगितला…

पिंपरी विधानसभेचे लाडके व लोकप्रिय आमदार अण्णा बनसोडे यांची महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महाराष्टात कौतुक होत असताना पुनमताई लोखंडे व अशोक अण्णा भडकुंबे मित्र परिवाराकडून कौतुकांचा वर्षाव होत असून,आमदारांवर अक्षरशः शुभेच्छा चा पाऊस पडत आहे…..

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!