spot_img
spot_img
spot_img

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या हस्ते अपघातग्रस्त कुटुंबाला मदतीचा धनादेश सुपूर्द

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पुणे येथील टाटा मोटर्स या कंपनीतील कंत्राटदार नियुक्त कंत्राटी कामगार पुष्पेंद्र कुमार यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी कामगार आयुक्त, टाटा कंपनीचे अधिकारी यांना पीडित कुटुंबाला तत्काळ आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या हस्ते पीडित कुटुंबाला 35 लाख रूपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

विधानसभा उपाध्यक्ष यांच्या दालनात झालेल्या पत्रकार परिषदेत टाटा मोटर्सचे व्यवस्थापक, कामगार विभागाचे अधिकारी, पोलीस अधिकारी व कामगार नेते आदी उपस्थित होते.

उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले की, अपघातानंतर कामगारांच्या कुटुंबांची जबाबदारी कंपनीने घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. सर्व संबंधित अधिकारी, पोलिस विभाग आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्या सहकार्याने पीडित कुटुंबाला 35 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय झाला, हे समाधानकारक असल्याचे  बनसोडे यांनी सांगितले.

या निर्णयामुळे पीडित कुटुंबाला दिलासा मिळाला असून, पुढील काळातही व्याजाच्या स्वरूपात त्यांना आधार मिळणार आहे, असेही उपाध्यक्ष बनसोडे यांनी सांगितले.

मृत्यू झालेल्या पुष्पेद्रकुमार यांना कंत्राटाचे काम दिलेले होते. या घटनेची गंभीरता लक्षात घेऊन मे.टाटा मोटर्स यांनी पीडित कुटुंबाला 30 लाख रुपये मुदत ठेव स्वरुपात आणि त्यावरील व्याजातून दर महिन्याला कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचे मान्य केले. तसेच, खर्चासाठी 5 लाख रुपये पीडित कुटुंबाला देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!