spot_img
spot_img
spot_img

बुद्धिबळपटू दिव्या देशमुखची ऐतिहासिक कामगिरी!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

भारताची युवा बुद्धिबळपटू दिव्या देशमुखने इतिहास रचत फिडे विश्वचषक स्पर्धा जिंकली आहे. स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्याच ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीचा पराभव करत दिव्या महिला विश्वचषक विजेती बनली आहे. यासोबतच तिने आपला ग्रँडमास्टर नॉर्म पूर्ण केला आहे आणि आता ती भारताची चौथी वुमन ग्रँडमास्टर झाली आहे. वयाच्या अवघ्या १९ वर्षी दिव्याने हे यश संपादन केले आहे.

दिव्याच्या या नेतृदीपक कामगिरीनंतर भारताचा जागतीक बुद्धिबळावर असलेले वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. दरम्यान दिव्याच्या या यशानंतर राजकीय वर्तुळातून देखील तिचं भरभरून कौतुक केले जात आहे.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिव्याचे अभिनंदन करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, दिव्या देशमुखच्या या यशाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले आहे. नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले, “मला अतिशय आनंद आहे की महाराष्ट्राच्या आणि नागपूरच्या दिव्या देशमुखने बुद्धिबळाच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत बाजी मारली आहे. ती पहिली किशोरवयीन खेळाडू आहे, जीने या स्तरावरील स्पर्धेत भाग घेऊन जेतेपद मिळवले आहे. यापूर्वीदेखील तिने भारतासाठी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये अनेक पदके जिंकली आहेत. तिने आतापर्यंत जवळपास ३५ पदके जिंकली असून, त्यापैकी २३ सुवर्ण पदके आहेत.”

शरद पवार म्हणाले की, “जॉर्जियातील बटुमी येथे संपन्न झालेल्या FIDE Women’s World Cup 2025 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दोन भारतीय खेळाडू दिव्या देशमुख आणि कोनेरू हम्पी यांच्यात झालेला सामना बुद्धिबळातील भारताच्या उल्लेखनीय कामगिरीचं प्रतीक ठरला. विजेतेपद, ग्रँडमास्टर टायटल आणि भारतीय लेकींचा अंतिम सामना हा भारतीय बुद्धिबळाचा सुवर्णक्षणच म्हणावा लागेल!”

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दिव्याच्या विजयानंतर पोस्ट केली आहे. “जॉर्जिया देशातील बटुमी शहरात खेळल्या गेलेल्या महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने भारताच्याच कोनेरू हम्पीचा पराभव करत विश्वचषकावर आपले नाव कोरले. असे विजेतेपद पटकवणारी ती पहिली भारतीय महिला बुद्धिबळपटू ठरली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!