शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील चिखली परिसरात बालघरे नगर, राजे शिवाजीनगर परिसरात नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवाव्या अशी मागणी राष्ट्रवादीचे व्यवस्थापन विभागाचे शहराध्यक्ष अकबर भाई मुल्ला यांनी क क्षेत्रीय कार्यालय यांच्याकडे केली आहे.
चिखली परिसरातील गट क्रमांक 754 /755 बालघरे नगर, राजे शिवाजीनगर या परिसरातील नागरिक मूलभूत सुविधेपासून वंचित आहेत या ठिकाणी रस्त्यांची देखभाल योग्य प्रकारे होत नाहीये, वाहतुकीला येथील रस्ते सुरक्षित नाहीये, तरी येथील रस्ते दुरुस्त करावे, त्याचप्रमाणे या भागात साफसफाई चे काम नियमितपणे करण्यात येत नाही, सफाई कामगारांना येथील रस्ते नियमितपणे साफसफाई करण्याच्या सूचना द्याव्या, तसेच येथील मुख्य रस्त्यांवर अद्यापही स्ट्रीट लाईट खांब बसविले गेले नाही. रस्त्यांवर स्ट्रीट लाईट खांब लवकरात लवकर बसविण्यात यावेत, येथील परिसरातील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे आवश्यक आहेत भविष्यात गुन्हेगारी घटना टाळण्यासाठी योग्य ठिकाणी सीसीटीव्ही बसविणे आवश्यक आहे. तरी योग्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे.
या परिसरातील नागरिक हे नियमित कर भरतात त्यामुळे त्यांना मूलभूत सुविधा पुरविणे प्रशासनाची जबाबदारी आहे.
तरी प्रशासनाने बालघरे नगर, राजे शिवाजीनगर, चिखली परिसरात नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवाव्या अशी मागणी अकबर भाई मुल्ला यांनी केली आहे.