spot_img
spot_img
spot_img

मोरवाडी येथे आयटीआय मध्ये विजय दिन साजरा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोरवाडी येथे दिनांक २६ जुलै २०२५ रोजी ‘विजय दिन’ साजरा करण्यात आला.  मा. मंत्री ॲड. मंगल प्रभात लोढा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता महाराष्ट्र यांच्या संकल्पनेतून राज्यातील सर्व आयटीआय मध्ये २६ जुलै हा दिन विजय दिन म्हणून साजरा करण्यात आला. २६ जुलै रोजी कारगिल मधील शिखरांवर पुन्हा तिरंगा फडकला. २६ जुलै हा केवळ एक दिवस नाही, तो भारताच्या शौर्य, बलिदान व स्वराज्याच्या संस्कृतीचा उत्सव आहे.

सदर दिवशी माझी सैनिकांना निमंत्रित करण्यात आले व त्यांचा सन्मान करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धा व भाषणाद्वारे कारगिल विजय दिनाचे महत्त्व नमूद केले.

सदर कार्यक्रमास प्रशांत गुलाबराव देवरे (मा.सै. सिग्नल्स), अनंत आगरकर (मा.सै. सिग्नल्स), रविंद्र माधवराव शेवाळे (मा. सै.इंजिनियर्स), संतोष कोंडीभाऊ चौरे (मा. सै. आर्टलरी) व प्रमोद निकम (मा. सै. कॅप्टन आर्टलरी) उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना कारगिल देण्याचे महत्त्व कळविले व कशाप्रकारे शूरवीर सैनिकांनी विजय मिळविला याबाबत माहिती सांगितली.

कार्यक्रमाचे नियोजन गटनिदेशक शर्मिला काराबळे व किसन खरात यांनी केले. सूत्रसंचालन गटनिदेशक मनोज ढेरंगे यांनी केले. प्राचार्य शशिकांत पाटील यांनी मनोगत व्यक्त करून प्रमुख उपस्थित पाहुणे यांचे आभार व्यक्त केले. कार्या अधीक्षक उमा दरवेश, मुख्य लिपिक प्रवीण शेलार, विजय भैलुमे, मयुरी वाडेकर, लेखापाल सुभाष देवकाते, लिपिक अमित सोळंकी, निदेशक विशाल रेंगडे, निलेश लांडगे तसेच सर्व संबंधित निदेशक यांनी कार्यक्रमाचे यशस्वीपणे संयोजन केले .

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!