शबनम न्यूज | प्रतिनिधी
मुळशी धरणात ८३.२० टक्के पाणीसाठा झालेला असून धरणाच्या सांडव्यातून मुळा नदीत १२ हजार २०० क्यूसेक्सने विसर्ग सुरु आहे, अशी माहिती सुरेश कोंडूभैरी, टाटा पॅावर, मुळशी धरण यांनी दिली आहे.
तसेच परिस्थितीनुसार विसर्ग कमी, अधिक करण्यात येईल, नागरिकांनी नदीपात्रात उतरु नये, तसेच खबरदारी घ्यावी, असे आवाहन देखील त्यांनी केले.