spot_img
spot_img
spot_img

ब्रिटिश पार्लमेंट, लंडन मध्ये डॉ. दीपक हरके यांचा एक्सलेंस अवॅार्ड देऊन सन्मान

शबनम न्यूज | प्रतिनिधी
लंडन ऑर्गनायझेशन ॲाफ स्किल्स डेव्हलपमेंट या संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागरिक व संस्थांचा “एक्सलेंस अवॅार्ड” देऊन सन्मान करण्यात आला. 
     हाऊस ऑफ कॅामन्स, ब्रिटिश पार्लमेंट लंडन येथे झालेल्या कार्यक्रमात लंडन ऑर्गनायझेशन ॲाफ स्किल्स डेव्हलपमेंट च्या सीईओ डॅा. परिन सोमाणी, खासदार बॉब ब्लॅकमन व गाम्बिया चे राजकुमार महामहिम इब्राहिम सान्यांग यांच्या हस्ते बाणेर, पुणे व अहिल्यानगर येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे ध्यानधारणा प्रशिक्षक ब्रह्माकुमार डॉ. दीपक हरके यांना “एक्सलेंस अवॅार्ड” देऊन सन्मानित करण्यात आले. 
    डॉ. हरके हे १८३ विश्वविक्रम करणारे १ ले भारतीय आहेत. भारताच्या प्राचीन राजयोगाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी विविध विश्वविक्रम केले आहेत. डॉ. हरके यांना यापूर्वी अनेक देशात पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये लंडन मधील ८ पुरस्कार यामध्ये ब्रिटिश पार्लमेंट व ऑक्सफर्ड विद्यालयात त्यांना विशेष सन्मानित करण्यात आले आहे. दुबई मध्ये ५ पुरस्कार, बँकॉक मध्ये ३ आणि नेपाळ मध्ये २ पुरस्कार मिळाले आहेत. तसेच रशिया, स्वित्झर्लंड, मलेशिया व श्रीलंकेमध्येही त्यांना पुरस्कार मिळाले आहेत. डॉ. हरके यांच्या कार्याची दखल मार्च २०२० मध्ये विश्वविख्यात फोर्ब्स मासिकाने देखील घेतली होती. डॉ. हरके हे महाविद्यालयात शिक्षण घेत असताना या संस्थेच्या संपर्कात आले व नंतर त्यांनी स्वतःचे संपूर्ण जीवन या कार्यासाठी समर्पित केले आहे. ते पूर्णवेळ ध्यानधारणेचा प्रचार व प्रसार करण्याचे कार्य जगभरात करत आहेत. ब्रिटिश पार्लमेंट मध्ये डॉ. दीपक हरके यांना सन्मानित केल्यामुळे बाणेर, पुणे आणि अहिल्यानगर येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्व विद्यालयाच्या सेंटरमध्ये आनंद उत्सव साजरा करण्यात आला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!