शबनम न्यूज
पुणे:अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट,कराड व ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव निमित्त महाराष्ट्रात विविध स्तरावर कार्य करणाऱ्या ३०० महिलांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन मा.प्रवीण काकडे सर(महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, ऑल इंडिया धनगर समाज महासंघ,दिल्ली व संस्थापक/अध्यक्ष अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट,कराड)यांनी पुण्यभूमी पुणे येथील सावित्रीबाई फुले सभागृह,गंजपेठ येथे रविवार दिनांक २०/७/२०२५ रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत केले होते.कार्यक्रमात विविध मान्यवरांनी अभ्यासपूर्ण मनोगते व्यक्त केली.विधान परिषदेचे माननीय आमदार रामहरी रुपनवर सरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा संपूर्ण इतिहास अचूक भाषेत उलगडून सांगितला.या प्रसंगी विविध अशा नऊ क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला.
याच कार्यक्रमात शैक्षणिक,सामाजिक,साहित्यिक,पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या सरस्वती माध्यमिक विद्यालय,आकुर्डी पुणे ३५ या प्रशालेतील सौ.प्रतिमा अरुण काळे यांना साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल “अहिल्यारत्न पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले.हा पुरस्कार सोहळा सर्व पुरुष वर्गाने आयोजित केलेला होता हे विशेष होते.
जसा व्यासपीठावर महिलांचा सन्मान केला गेला तसाच सन्मान जीवन वाटेवर प्रत्येकाने करणे अपेक्षित आहे असे मत सौ.प्रतिमा काळे मॅडम यांनी व्यक्त केले.याबाबत विविध स्तरावरून त्यांचे कौतुक होत आहे.