spot_img
spot_img
spot_img

संकल्प सोशल फाउंडेशनच्या वतीने १० वी व १२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा ‘गुणगौरव सोहळा’

शबनम न्यूज | प्रतिनिधी

संकल्प सोशल फाउंडेशन यांच्यावतीने दहावी व बारावी माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी दिशा देण्यासाठी व त्यांना योग्य मार्ग दाखविण्यासाठी ह.भ.प शेखर महाराज जांभुळकर यांचे विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती चिंचवड विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष तसेच संकल्प सोशल फाउंडेशन चे संस्थापक, अध्यक्ष बापू दिनकर कातळे यांनी दिली आहे.

सदर गुणगौरव सोहळा रविवार (दि. २७) जुलै रोजी सकाळी ११:३० वाजता बाप देव महाराज लॉन्स, किवळे येथे संपन्न होणार आहे. तसेच कार्यक्रमानंतर भोजनाची व्यवस्था देखील यावेळी करण्यात आली आहे. त्याच प्रमाणात दहावी आणि बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात येणार आहे.

९० ते १०० टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकल भेट वस्तु म्हणून देण्यात येणार आहे, तर ८० ते ९० टक्के गुण मिळाविणाऱ्या विद्यार्थ्यांना बोट कंपनीची स्मार्ट वॉच मिळणार आहे, तर ५० ते ८० टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना मॅक्सीमा कंपनीची घड्याळ देण्यात येणार आहे, तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!