शबनम न्यूज | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांच्या वतीने इंदिरानगर, चिंचवड येथील शिव मंदिर परिसरात वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली.
यावेळी वेगवेगळ्या प्रकारची झाडे परिसरातील यावेळी लावण्यात आली. यावेळी महिला ,जेष्ठ नागरिक, युवक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. परिसरातील अनेक नागरिकांनी येथे उपस्थित राहून आपला सहभाग देखील नोंदवला.
यावेळी बोलताना भाऊसाहेब भोईर म्हणाले की, निसर्गाप्रती आपली जबाबदारी पार पाडण्याच्या हेतूने तसेच आपली जबाबदारी म्हणून हा एक केलेला छोटासा प्रयत्न असल्याचे भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले.