spot_img
spot_img
spot_img

PUNE : वडिलांनीच केली मुलाची हत्या !

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पुणे शहरातील फुरसुंगी परिसरात दारू पिऊन घरात सतत वाद घालणाऱ्या मुलाचा वडीलांनी गळा दाबून खून केल्याची घटना घडली आहे.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.प्रशांत सुरेश जमदाडे (वय 35) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे.तर सुरेश बाबुराव जमदाडे (वय 59 रा. कैलासनगर, वलवा वस्ती, वडकी, हवेली) असे अटक केलेल्या आरोपी वडीलांचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मयत प्रशांत याला दारूचे व्यसन होते.यावरून सातत्याने घरामध्ये वाद होत होते.नेहमी प्रमाणे प्रशांत हा दारू पिऊन आला आणि आई वडिलांना शिवीगाळ करू लागला.त्यावेळी मुलगा प्रशांत आणि वडील सुरेश यांच्यामध्ये भांडण झाली. वडिलांनी प्रशांत ला जमिनीवर खाली पाडून कापडी गमजाने गळा आवळला.त्यानंतर त्याचे डोके जमिनीवर आपटून खून केल्याची घटना घडली.या प्रकरणी आरोपी वडील सुरेश जमदाडे यांना अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!