spot_img
spot_img
spot_img

यंदाचा ‘MAMI मुंबई फिल्म्स फेस्टिव्हल रद्द!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

मुंबईमधील सिनेवर्तुळात प्रतिष्ठेचा मानला जाणारा चित्रपट महोत्सव म्हणजे, ‘मुंबई अकॅडमी ऑफ मूव्हिंग इमेजेस’ अर्थात ‘MAMI मुंबई फिल्म्स फेस्टिव्हल’. दरवर्षी हा फेस्टिव्हल मोठ्या दिमाखात पार पडतो. मात्र यंदाचा, २०२५ चा ‘MAMI मुंबई फिल्म फेस्टिव्हल’ रद्द करण्यात आला आहे, अशी अधिकृत माहिती फेस्टिव्हलचे संचालक शिवेंद्रसिंह डुंगरपूर यांनी दिली आहे.

इन्स्टाग्रामवरील शेअर करण्यात आलेल्या या पोस्टमध्ये असं म्हटलंय, “आम्हाला हे कळवण्यात खंत वाटत आहे की, २०२५ मधील MAMI फिल्म फेस्टिव्हल होणार नाही. या फेस्टिव्हलची नव्या टीमसह पुनर्रचना करण्यात येत आहे, जेणेकरून हा फेस्टिव्हल भारतासह जगभरातील स्वतंत्र आणि प्रादेशिक सिनेमांचा दर्जेदार मंच म्हणून पुन्हा उभा राहील.”

याबद्दल महोत्सवाचे संचालक शिवेंद्रसिंह डुंगरपूर यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “हा फेस्टिव्हल म्हणजे केवळ चित्रपट दाखवण्याचा कार्यक्रम नाही, तर त्याला शहराशी जोडणं, प्रेक्षकांशी संवाद साधणं आणि स्वतंत्र निर्मिती करणार्‍यांना व्यासपीठ देणं हे आमचं उद्दिष्ट आहे.” २०२४ मध्ये MAMI फेस्टिव्हल रिगल सिनेमा आणि पीव्हीआर जुहू इथे झाला होता. याआधी अनेक वर्षे प्रायोजक (स्पॉन्सर) असलेल्या जिओ (Jio) ने आपला पाठिंबा काढल्यानंतर आर्थिक बळ कमी होतं आणि अनेक गोष्टी नीट सांभाळाव्या लागल्या होत्या, असं डुंगरपूर यांनी सांगितलं.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!