शबनम न्यूज | प्रतिनिधी
राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करून त्यांचा सातबारा कोरा करावा तसेच दिव्यांग आणि विधवांचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत या मागणीसाठी येत्या दि. २४ जुलै रोजी राज्यभर दोन तास चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी येथे केली.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कसबा बावड्यातील श्री मंगल कार्यालयात हुंकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दिव्यांग बांधवांसह महिला, शेतकरी यांची मोठी उपस्थिती होती.
राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा यासाठी अन्नत्याग आंदोलन झाले. पायी यात्रा काढली. मात्र राज्य सरकारने याबाबत कोणताच निर्णय घेतला नाही. आंदोलनाकडे दुर्लक्ष केले. याबाबत सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी येत्या दि. २४ जुलै रोजी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग संस्थेच्या वतीने घेण्यात आला असल्याचे सांगून बच्चू कडू म्हणाले.