spot_img
spot_img
spot_img

खेळामुळे सर्वांगीण विकास होतो – बांगर

  • सीएमएस शाळेत बॅडमिंटन स्पर्धा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

निगडी येथील सीएमएस हायर सेकंडरी स्कुलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धेचे उदघाटन प्रशाकीय अधिकारी संगीता बांगर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सहा. पो. आयुक्त (निवृत्त) बॅडमिंटन खेळाडू मनोहर जोशी, सीएमएस चे अध्यक्ष टी.पी विजयन, सरचिटणीस सुधीर नायर,खजिनदार पी. अजय कुमार, कलावेदी प्रमुख पी.व्ही भास्कर, व्हीके रामकृष्णन, जी.एस नायर, मुख्याध्यापिका बीजी गोपकुमार, चैताली लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बांगर म्हणाल्या कि, आपल्या आयुष्यात जगत असताना आपल्याला शारीरिक, सामाजिक, भावनिक, आणि शैक्षणिक सुधारणा होत असतात. खेळामुळे सर्वांगीण विकास होत जातो. खेळाडूला स्पर्धेमध्ये समोरच्या विरोधकाची पुढची चाल आधीच लक्षात घेऊन त्यावरती आपलं कौशल्य दाखवून खेळायचं असतं. स्पर्धेमध्ये खेळाची भावना असावी म्हणजे जेव्हा खेळ चालू व्हायच्या आधी आपण विरोधकाचा हस्त आंदोलन करतो तसेच खेळ संपल्यानंतर पराभव झाल्यानंतर सुद्धा जिंकलेल्याचं अभिनंदन करतो यामध्ये खेळाची भावना जोपासली जाते. स्पर्धेत ३६ शाळांतील १५६ खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेसाठी क्रिडा शिक्षक सोनाली पवार, सुजाता गायकवाड, हरिहरण श्रीधरण यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!