spot_img
spot_img
spot_img

पिंपरी येथे वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

वुई टुगेदर फाउंडेशन आणि जिवाजी महाले स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या परतीच्या प्रवासात पिंपरी गाव येथे मुक्कामी असताना मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात सुमारे ३७५ वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, मसाज आणि औषधांचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमात वुई टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे, सचिव जयंत कुलकर्णी, सहसचिव मंगला डोळे-सपकाळे, सलीम सय्यद यांनी सहभाग घेतला. तसेच जिवाजी महाले स्मारक समितीच्या अनिता वाळुंजकर व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले.

डॉ. मोहन काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत नेटकेपणाने आणि सेवा भावनेने आरोग्य तपासणी पार पाडली.
या वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी राज्यमंत्री सदाशिव खाडे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, माजी नगरसेवक संदीप वाघेरे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती श्रीरंग शिंदे, प्रदेश सदस्य गणेश वाळुंजकर, प्रदेश उपाध्यक्ष कैलास सानप, गणेश ढाकणे, राजू सावंत, जयेशभाई चौधरी, देवदत्त लांडे, ज्येष्ठ नागरिक दत्तोबा नाणेकर, डॉ. मोहन काळे, किसन कापसे, ह.भ.प. बाळासाहेब वाघेरे, दिगंबर वाघेरे, संतोष वाघेरे, रोटरी क्लबचे सेक्रेटरी वसंत ढवळे, पिंपरी विभाग अध्यक्ष राजेश लोखंडे, जिवाजी महाले स्मारक समितीचे अध्यक्ष चेतन महाले, हरिभाऊ वाळुंजकर, गौरव वाळुंजकर, सुरेश मोरे, नितीन अमृतकर, विलास घरटे, मनीषा पवार, विजया घरटे, अनिता चोपडे, मनीष पंजाबी, ओम शर्मा,आदी मान्यवर उपस्थित होते.

पोपट बच्चे,गणेश बच्चे,अक्षय गारगोटे,रोहिणी बच्चे,मारुती पानमंद,अर्चना बच्चे,आकाश खिल्लारे, चैतन्य फार्मा ग्रुप, वुई टुगेदर फाउंडेशन, जिवाजी महाले स्मारक समिती यांचे विशेष सहकार्य लाभले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!