शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यावर फेसबुकच्या माध्यमातून खाल्याच्या पातळीवर असभ्य भाषेत सुनील उभे नावाच्या व्यक्तीने कमेंट व पोस्ट केली होती. या प्रकरणी त्याला काल पर्वती पोलीस स्टेशनं मध्ये अटक करण्यात आली असून.. त्याला कठोर शिक्षा व्यावी यासाठी आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्या समोर निषेध आंदोलन करण्यात आले..
या नराधमला जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्यावी अशी मागणी पुण्यश्लोक राजमाता प्रतिष्ठान चे अध्यक्ष व राष्ट्रीय खेळाडू अरुण सर पाडुळे यांनी केली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी हे समस्त धनगर बांधवांच श्रद्धास्थान आहे. राजमाता अहिल्याबाई होळकर या केवळ एक शासिका नव्हत्या, तर त्या धर्म, न्याय, सेवा, त्याग आणि मातृत्व यांचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. त्यांच्या कार्याचा आदर्श आजही अनेक प्रशासक व नागरिक घेतात. त्यांच्या जीवनातून मिळणारी प्रेरणा ही काळाच्या पलीकडची आहे. राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना इतिहासात ‘पुण्यश्लोक’ व ‘राजमाता’ ही उपाधी आदराने दिली गेली आहे.
अशा आदर्श राजमाते बद्दल अपशब्द वापरणाऱ्या, समाजात जातीय तेढ निर्माण करनाऱ्या समाज कंठकाला कठोर शिक्षा व्हावी हीच समाज बांधवांची प्रमुख मागणी होती. यावेळी अरुण सर पाडुळे (अध्यक्ष- पुण्यश्लोक राजमाता प्रतिष्ठान) श्री भरत महानवर, दिपक भोजने, शिवाजी घरबूडवे, गणेश पाडुळे, सागर कोपनर, शहाजीधन्ने,सुधाकर अर्जुन,विजय महानवर,राहूल मदने,अमोल महानवर,आकाश केळे , नागनाथ काळे,धनंजय गाडे, रेणुकाताई भोजने,अखिल भारतीय छावा संघटना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मच्छिंद्र चिंचोळे, पिं.चिं. शहर अध्यक्ष संजय भाऊ कांबळे, पिं. चिं. शहर सचिव श्रीकांत मलिशे,मुळशी तालुका अध्यक्ष आण्णा खोबरे, शैलेश इंचुरे आदि उपस्थित होते.