spot_img
spot_img
spot_img

विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी अण्णा बनसोडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

शबनम न्यूज , प्रतिनिधी :

महाराष्ट्रातील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाने विधानसभेच्या उपाध्यक्ष पदासाठी पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या नावापुढे अंतिम मोहर लावली आहे. त्या नुसार महाराष्ट्र विधानसभा उप अध्यक्ष पदा साठी अण्णा बनसोडे यांनी उमेदवारी अर्ज भरला अण्णा बनसोडे हे पिंपरी विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिले आहेत . अण्णा बनसोडे यांनी महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष या पदाचा अर्ज भरला या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उप मुख्यमंत्री अजित पवार ,चंद्रकांत पाटील, उदय सामंत उपस्थित होते.

अर्ज विधानमंडळ सचिव जितेंद्र भोळे यांचेकडे सादर कारणात आला. अण्णा बनसोडे राजकारणात अजित पवारांचे खूप जवळचे सहकारी मानले जातात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत अण्णा बनसोडे यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले.

आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता, हा निर्णय राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचा ठरला आहे. . कारण पिंपरी चिंचवड़ मनपा निवडणुकी साठी आता भाजप पाठोपाठ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीने सुद्धा लक्ष केंद्रीत केले आहे. तसेच अनेक इच्छूक कार्यकर्ता पदाधिकारी निवडणूकीच्या तयारीला लागले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!