शबनम न्यूज | प्रतिनिधी
वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक केल्यास दुप्पट परतावा देण्याच्या अमिषाने २ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या चौघांचा अटकपूर्व जामिनअर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.एस.वाघमारे यांनी फेटाळला आहे. सरकारी पक्षातर्फे मारुती वाडेकर यांनी तसेच मूळ फिर्यादीच्यावतीने अॅड. रमेश राठोड यांनी जामिनास विरोध केला.
गोपालन अनिष, मनीष कुमार अगरवाल, पराग गर्ग आणि मुकुल जैन अशी जामीन फेटाळलेल्यांची नावे आहेत. याबाबत संतोष सेवू पवार (वय ३७, रा. बावधन बुद्रुक) यांनी बावधन पोलिसात फिर्याद दिली होती. २०१९ मध्ये संतोष यांची एकाच्या माध्यमातून चौघांची ओळख झाली. चौघे नोएडातील शिक्षण कंपनीचे संचालक आहेत. संतोष रोख १ कोटी आणि ऑनलाईन १ कोटी दिले. त्यांना परतावा मिळलाच नाही. त्यामुळे त्यांनी पोलिसात धाव घेतली. यामध्ये चौघांनी अॅड. विपुल दुशिंग यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता.