शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका व जिल्हा क्रीडा परिषद पुणे आयोजित सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा दिनांक 16 जुलै 2025 ते 26 जुलै 2025 या कालावधीत संपन्न होणार आहेत. दिनांक 16 जुलै 2025 रोजी 17 वर्षाखालील मुलींच्या गटाने स्पर्धेला सुरुवात झाली.
स्पर्धेचे उदघाटन सहाय्यक आयुक्त पंकज पाटील (क्रीडा विभाग), क्रीडा अधिकारी रंगराव कारंडे, ,क्रीडापर्यवेक्षक समन्वयक दीपक कन्हेरे, स्पर्धाप्रमुख व क्रीडा पर्यवेक्षक बाळाराम शिंदे, तसेच क्रीडा पर्यवेक्षक सुनील ओहाळ यांच्या हस्ते पार पडले.
या प्रसंगी क्रीडा समन्वयक सौ ऐश्वर्या साठे, क्रीडा शिक्षक श्री विजय लोंढे श्री दीपक जगताप, सौ वैशाली साळी यांचे सहकार्य लाभले. सदर स्पर्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल संत तुकाराम नगर पिंपरी येथे संपन्न झाल्या, या स्पर्धेकरिता पंचप्रमुख श्री.प्रवीण शिवचंद ठोके यांनी काम पाहिले.