शबनम न्यूज | प्रतिनिधी
लोकमान्य टिळक यांचं पणतू आणि केसरीचे विश्वस्त संपादक डॉ. दीपक टिळक यांचे अल्पशा आजाराने बुधवारी पहाटे निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या मागे मुलगा डॉ. रोहित टिळक, मुलगी डॉ. गीताली टिळक, नातवंडे असा परिवार आहे.
आज दुपारी १२ वाजता त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ समशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. वसंत व्याख्यानमाला, टिळक स्मारक मंदिर, हिंदू महिला अनाथ आश्रम, वेदशास्त्त्रोत्तेजक सभा या संस्थांचे ते अध्यक्ष होते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे ते विद्यमान कुलपती होते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाला डॉ. यांच्या कार्यकाळात मोठी उंची प्राप्त झाली.