शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील जाधववाडी परिसरात कार्यरत असणारे राष्ट्रवादी पक्षाचे युवा नेते विशाल भाऊ आहेर यांच्या माध्यमातून महिलांसाठी ऑटोमोबाईल पेंटिंग कौशल्य प्रशिक्षण व नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीजमध्ये महिलांसाठी करिअर घडविण्यासाठी तसेच महिलांचे सशक्तिकरण करण्यासाठी विशाल आहेर यांच्या माध्यमातून महिंद्रा कंपनीमध्ये महिलांना प्रशिक्षण नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. हे प्रशिक्षण शंभर टक्के मोफत असून चार महिन्यांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण यामध्ये देण्यात येणार आहे. इंडस्ट्रीज मध्ये करिअर करण्याची संधी या निमित्ताने महिलांसाठी उपलब्ध झाली आहे.
प्रशिक्षणासाठी प्रतिमहा पंधराशे रुपये, प्रवास भरता ही यामध्ये दिला जाणार आहे. तसेच प्रशिक्षणासाठी येणाऱ्या पुण्याबाहेरील महिला व मुलींसाठी निवास व भोजनाची व्यवस्था केली जाणार आहे. वय 18 पूर्ण ते 28 वयाच्या विवाहित व अविवाहित महिलांसाठी तसेच किमान बारावी उत्तीर्ण असणाऱ्या महिला व मुलींसाठी हे प्रशिक्षण शिबिर असणार आहे. या प्रशिक्षण शिबिरामध्ये महिलांना महत्त्वपूर्ण कौशल्य शिकता येणार आहे.
तसेच तांत्रिक कौशल्य, स्प्रे पेंटिंग, तंत्र रंग मिक्सिंग व मॅचिंग पॉलिशिंग आणि बीटिंग पेंट स्प्रे बूथ मध्ये काम करण्याचा अनुभव, शॉप स्कीम, प्रोफेशनलीझम वेळेचे व्यवस्थापन, संवाद कौशल्य, संगणक ज्ञान, उपजीविका टिकविण्यासाठी मॉक इंटरव्यू ,नोकरी मिळविणे ,करिअर मार्गदर्शन असे उपक्रम असणार आहेत. हे प्रशिक्षण डॉन बॉस्को प्रायव्हेट आयटीआय कॉलेज चिंचवड काळभोर नगर प्रतिभा कॉलेज जवळ येथे होणार असून अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन विशाल भाऊ आहेर यांच्या वतीने करण्यात आले आहे.