spot_img
spot_img
spot_img

विकास आराखड्यातील आरक्षणाला ग्रामस्थांचा विरोध ; बापू कातळे यांचा आंदोलनाचा इशारा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

आरक्षणामुळे महानगरपालिकेच्या प्रारूप विकास आराखड्यातील किवळे गावातील अनेक शेतकरी आणि नागरिकांवर अन्याय होणार आहे. या आरक्षणाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध सुरू झाला आहे. आरक्षणामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होणार असून, अनेकांच्या राहत्या घरांवरही कुऱ्हाड कोसळणार आहे. दरम्यान, सदर विकास आराखड्याविरोधात सामाजिक कार्यकर्ते बापू कातळे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

याबाबत बोलताना शेतकरी संदीप तरस म्हणाले की, वडिलोपार्जित ७२ गुंठे शेती आणि आमचं राहते घर पालिकेने आरक्षित केले आहे. १८ मीटर रस्ता आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्र या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. त्यामुळे आमचं सर्वस्व हिरावलं जाण्याची भीती आहे.

ग्रामस्थांनी हा निर्णय लोकशाहीविरोधी ठरवला असून आरक्षण टाकण्यापूर्वी गावकऱ्यांना विश्वासात न घेतल्याचा आरोप केला आहे. पर्यावरणप्रेमी हरीश कदम यांनी दफनभूमी नदीच्या सान्निध्यात उभारण्याच्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेत या कृतीमुळे पर्यावरण आणि जनतेच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होणार आहे, असे मत कदम यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान अनेक नागरिकांना महापालिकेच्या प्रारूप विकास आराखड्याबाबत माहिती नाही. त्यामुळे त्यांनी या आरक्षणांना अद्याप विरोध केलेला नाही. मात्र आम्ही नागरिकांमध्ये जाऊन जनजागृती करीत असल्याचे बापू कातळे यांनी सांगितले.

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!