spot_img
spot_img
spot_img

सांगवीत गुरुपौर्णिमेनिमित्त साईंच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

शबनम न्यूज | प्रतिनिधी

नवी सांगवीत सांगवी फाटा येथे गुरुपौर्णिमेनिमित्त साईंच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.यावेळी या उत्सवात भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.भाविकांनी मोठ्या भक्तीभावाने साईबाबांचे दर्शन घेतले.
गुरुपौर्णिमा हा दिवस गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे.याच दिवशी सांगवी फाटा येथे संजय गांधी निराधार योजनेचे संजय मराठे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून साईंच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.यावेळी मंदिर सभोवताली भव्य मंडप,विद्युतरोषणाई,आकर्षक रांगोळी,फुलांच्या माळांनी मंदिर परिसर उजळून निघाला होता.
साईंच्या मूर्तीची प्रतिष्ठापना विधिवत पूजा करून,होमहवन,सत्यनारायण महापूजा,तीर्थ प्रसाद,महाप्रसाद वाटप करून उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.सकाळी,दुपारी,सायंकाळी साईंची आरती करण्यात आली.
यादरम्यान आनंद रायचूरकर,रमेश चौधरी,तौफिक सय्यद,रमेश गाढवे,राजू मोरे,प्रवीण भोसले,गिरीश देवकाते,वैभव चांदगुडे,सचिन खराडे,विश्वनाथ गदवालकर,सुशील पासलकर,प्रकाश खाटमोडे,प्रीतम करडक,प्रकाश भोईटे,नागराज गदवालकर,मिलिंद जगताप यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!