राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राज्यात काही दिवसातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत ,या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे दरम्यान राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजीनामा दिला आहे नवीन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे होणार असल्याची माहिती समोर येत आहे. शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार मंगळवारी स्वीकारणार असल्याचे बोलले जात आहे राज्यात काही दिवसातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात बदल करण्यात आले आहेत.