शबनम न्यूज | प्रतिनिधी
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शरचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय, डुडूळगाव, आळंदी जि.पुणे या ठिकाणी विद्यार्थी कल्याण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १० जुलै वार गुरुवार रोजी व्यासमुनी यांच्या जयंतीचे औचित्य साधून गुरुपौर्णिमा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. संजीव कांबळे यांनी गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाचा उद्देश व इतिहास थोडक्यात स्पष्ट केला तसेच प्रमुख वक्त्यांचा परिचय विद्यार्थी कल्याण अधिकारी तसेच राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. माणिक कसाब यांनी करून दिला.
या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला तसेच महाविद्यालयातील सौ. सुषमा जानवेकर, कु.मयूर नागणे, कु.रोशण चव्हाण, कु. वैष्णवी तापकीर, कु.आशिष काटकर व कु.श्रेया ढसाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते श्री.ह.भ.प. प्रा. सुभाष महाराज गेठे यांनी ‘गुरुपौर्णिमा महिमा व भारतीय संस्कृती’ या विषयावर भाष्य करतांना भारतीय संस्कृती ही गुरु शिष्यांच्या परंपरेने नटलेली असून सक्षम नागरिक बनविण्यासाठी शिक्षक हा घटक कसा महत्वपूर्ण आहे तसेच अंधकारमय जीवनाला प्रकाशमान करण्यासाठी गुरुचा आदर्श व ज्ञान कसे कारणीभूत ठरते या संदर्भात मत व्यक्त केले. व्यासचा अर्थ बुद्धी, ज्ञान असा होत असून माणसाला तारणे व जगविणे म्हणजे ज्ञान होय. ज्ञानाशिवाय कोणतीही गोष्ट पवित्र नसून ज्याच्याकडून चांगला गुण घेता येईल तो गुरुस्थानी असून प्रत्येक व्यक्तीने स्वतःशी प्रामाणिक राहून ज्ञान आणि बुद्धीवर निरंतर प्रेम केले पाहिजे तसेच मानवी शरीरातील डोळे आणि कान एकत्र आल्याशिवाय खऱ्या ज्ञानाची प्राप्ती होत नाही या संदर्भात मत व्यक्त करून प्राचीन वेद, पुराण, रामायण व महाभारतातील गुरु शिष्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेऊन विविध उदाहरणासह मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नाथा मोकाटे यांनी भारतीय संस्कृतीचे वेगळेपण तसेच विविधता स्पष्ट करून बाराव्या शतकात ‘ हे विश्वची माझे घर ‘ ही संकल्पना मांडणारे संत ज्ञानेश्वर यांच्यामुळे खऱ्या अर्थाने जागतिकीकरणाची संकल्पना अस्तित्वात आली.
जगात सर्वश्रेष्ठ गोष्ट म्हणजे ज्ञान असून विना गुरु ज्ञान हे शून्य आहे तसेच व्हाट्सअप फेसबुक व ट्विटर या सारख्या सोशल मीडिया पासून मिळणारे ज्ञान हे अल्पकाळ टिकणारे असून दीर्घकाळ ज्ञान देणारे विविध ग्रंथ व पुस्तके आहेत असे मत व्यक्त करून ज्याने सृष्टी निर्माण केली त्याला गुरु मानले पाहिजे तसेच टिकाऊ ज्ञानासाठी जगात गुरुशिवाय पर्याय नाही या संदर्भात ऐतिहासिक व आधुनिक काळातील विविध उदाहरणांचे दाखले देत अनमोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार मा.श्री.मयूर मुरलीधर ढमाले व प्रशासकीय संचालक प्रा.डॉ.राजीव पाटील यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमासाठी श्री.प्रवीण भावे, प्रा.डॉ.पांडुरंग मिसाळ, प्रा.डॉ.सुरेंद्र पवार, प्रा.सविता मानके, प्रा. दिपाली ताम्हणे, प्रा.यशोदा आनेराव, प्रा. दिपाली सोनवणे, प्रा. पूजा खवले, डॉ.संतोष कदम, प्रा.प्रभाकर गायकवाड, प्रा.मिरा केसकर, प्रा.सीमा साळुंखे, प्रा.रेखा सुतार, प्रा. रोहित कांबळे, प्रा.महेश म्हसागर, प्रा.सीमा साळुंखे, प्रा.चित्रा महाजन, प्रा.पायल करपे, प्रा.मीना शिंदे, प्रा.प्रतिक्षा शिंगाडे, सौ.वर्षा ताजणे, कु.नेहा लांडगे, श्री. सचिन गावडे, श्री. वैभव बडवे, श्री.श्रीकांत कांबळे, सौ.वैशाली ढाकणे, सौ.शारदा बुरुकुल इत्यादी शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय आणि रामचंद्र पाटील औटी कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.परमेश्वर भत्ताशे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा.डॉ.पांडुरंग मिसाळ यांनी मानले. या कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदानाने झाली.