शबनम न्यूज | प्रतिनिधी
पत्नी आणि तिच्या मित्राने दिलेल्या त्रासामुळे तरुणाने आत्महत्या केल्याची घटना नाना पेठेत घडली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पत्नीसह तिच्या मित्राविरोधात समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अतुल मारुती कदम असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.
अतुल यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पत्नी सोनाली अतुल कदम तसेच तिचा मित्र कृष्णा शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अतुल यांची आई माधुरी मारुती कदम यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अतुल आणि सोनाली यांचा २०१५ मध्ये विवाह झाला होता. पत्नी आणि तिच्या मित्राने दिलेल्या त्रासामुळे मुलगा अतुलने आत्महत्या केल्याचे आई माधुरी यांनी फिर्यादीत म्हटले आहे.