spot_img
spot_img
spot_img

हिंजवडीत घरगुती गॅसचा काळाबाजार ; पाच जण अटक

शबनम न्यूज | प्रतिनिधी

घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस भरुन चढ्या दराने काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याचा प्रकार हिंजवडीत उघडकीस आला. पोलिसांनी छापा मारून कारवाई करीत अवैध साठ्यासह पाच जणांना अटक केली.

धर्मपाल जगदीश बिश्नोई ( वय २३, हिंजवडी), अशोक बाबुराव सूर्यवंशी ( वय ३२, पिंपळे सौदागर), अशोक ओमप्रकाश खिलारी ( वय २४, हिंजवडी), बाळु बापू हजारे (वय २५, मारुंजी), ओमप्रकाश सोहनलाल खिल्लेरी ( वय ४५, हिंजवडी) अशी अटक करण्‍यात आलेल्‍या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी खंडणी विरोधी पथकातील विजय नलगे यांनी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे घरगुती गॅस सिलेंडरमधून धोकादायक पद्धतीने व्यावसायिक सिलेंडर मध्ये गॅस भरत होते. त्या सिलेंडरची बाजारात चढ्या दराने विक्री केली जात होती. याबाबत माहिती मिळाली असता छापा मारून कारवाई केली. आरोपींकडून २० लाख २५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्‍तगत केला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!