spot_img
spot_img
spot_img

‘सक्षमा एस एच जी (SHG) ई-पोर्टल’चे आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते उद्घाटन

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महिला सक्षमीकरणासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका विविध स्तरांवर प्रयत्नशील आहे. महापालिका समाज विकास विभाग आणि टाटा स्ट्राईव्हने तयार केलेल्या ‘SHG ई-पोर्टल’वरील ‘सक्षमा’ पेजमुळे महिलांना स्वतःच्या हातांनी बनविलेल्या वस्तू विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. यामुळे महिला रोजगारनिर्मितीच्या संधी मोठ्या प्रमाणावर निर्माण होतील असे प्रतिपादन महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका समाज विकास विभाग आणि टाटा स्ट्राईव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘सक्षमा प्रकल्पा’ अंतर्गत महिला बचत गटांच्या वस्तू विक्रीसाठी तयार करण्यात आलेल्या ‘SHG ई-पोर्टल’वरील ‘सक्षमा’ पेजचे उद्घाटन प्रसंगी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह हे बोलत होते.

या उद्घाटनप्रसंगी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उप आयुक्त ममता शिंदे, सहाय्यक समाज विकास अधिकारी संतोषी चोरघे, तसेच टाटा स्ट्राईव्हचे प्रतिनिधी अमेय वंजारी, बिचिथा जॉयसे, स्नेहल विचारे, सचिन उपाध्याय, संतोष डोंगरे, अश्विनी सांगेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या नव्या डिजिटल उपक्रमाच्या माध्यमातून महिलांनी बनविलेल्या वस्तूंना नव्या बाजारपेठा उपलब्ध होतील आणि त्यातून रोजगार व उत्पन्नाच्या संधी मोठ्या प्रमाणावर निर्माण होतील. सक्षमा प्रकल्पाअंतर्गत आतापर्यंत ८ महिला फेडरेशनची स्थापना करण्यात आली आहे. या फेडरेशनद्वारे महिलांना व्यावसायिक संधी आणि सक्षमीकरणासाठी भक्कम आधार देण्यात येत आहे.

या कार्यक्रमात आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी बनविलेल्या वस्तूंची प्रत्यक्ष पाहणी केली आणि त्यांचे कौतुक केले. या वस्तूंमध्ये स्थानिक, हस्तकलेच्या, उपयुक्त गृहवस्तूंचा समावेश होता. कार्यक्रमात विविध क्षेत्रीय कार्यालयांतील फेडरेशनच्या महिला पदाधिकाऱ्यांचा प्रोत्साहनपर सन्मान करण्यात आला.

सन्मान झालेले महिला फेडरेशन

  • अ क्षेत्र: संजीवनी फेडरेशन – अध्यक्ष असमा मुलानी, सचिव कविता खराडे, खजिनदार विभा इंगळे
  • ब क्षेत्र: उडान फेडरेशन – अध्यक्ष वर्षा सोनार, सचिव अनिता मठपती, खजिनदार वैशाली घाटके
  • क क्षेत्र: स्वरूपा फेडरेशन – अध्यक्ष सिंधू किवळे, सचिव स्नेहा गिरधारी, खजिनदार संध्या परदेसी
  • ड क्षेत्र: आरंभ फेडरेशन – अध्यक्ष उषा काळे, सचिव मीनल ठेंगे, खजिनदार मीनाक्षी शेट्टीवार
  • इ क्षेत्र: झेप फेडरेशन – अध्यक्ष रेखा सोमवंशी, सचिव संगीता सस्ते, खजिनदार उर्मिला वाकचौरे
  • फ क्षेत्र: एकता फेडरेशन – अध्यक्ष उमा साळवीकर, सचिव रेश्मा घुले, खजिनदार कमल सोनवणे
  • ग क्षेत्र: गरुड झेप फेडरेशन – अध्यक्ष माधुरी भोसले, सचिव सुवर्णा सोनवळकर, खजिनदार लता गायकवाड

ह क्षेत्र: अल्फा फेडरेशन – अध्यक्ष कोमल गावधनकर, सचिव राखी धार, खजिनदार रचना वारे

पिंपरी चिंचवड शहरातील महिलांच्या शाश्वत विकासासाठी शाश्वत रोजगार अत्यावश्यक आहे. फेडरेशन निर्मितीद्वारे महिलांना उद्योगशीलतेच्या संधी मिळणार असून समाज विकास विभागाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या ई-पोर्टलमुळे महिला बचत गटांच्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.
— प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी चिंचवड शहरातील महिलांमध्ये विविध कौशल्ये आहेत, परंतु त्यासाठी योग्य बाजारपेठ मिळवणे मोठे आव्हान होते. आजच्या डिजिटल युगात सक्षमा ई-पोर्टल हे त्या दृष्टीने एक मोठे पाऊल आहे. समाज विकास विभागाच्या मार्फत शहरातील सर्व महिलांनी याचा लाभ देण्याचा प्रयत्न आहे.
— ममता शिंदे, उप आयुक्त, समाज विकास विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!