spot_img
spot_img
spot_img

PUNE : २६ लाखांचे अमली पदार्थ जप्त

शबनम न्यूज | प्रतिनिधी

कोंढवा भागात अफू बाळगणाऱ्या राजस्थानातील एकाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून १४ लाख ९८ हजारांचा अफू जप्त करण्यात आला. बिबवेवाडी भागात अमली पदार्थविरोधी विभागाने कारवाई करून एकाकडून ११ लाखांचे मेफेड्रोन जप्त केले.

कोंढवा भागात अमली पदार्थविरोधी पथक गस्त घालत होते. त्या वेळी भैरवनाथ मंदिराजवळ एकजण थांबला असून, त्याच्याकडे अफू असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकातील पोलिस कर्मचारी सचिन माळवे यांना मिळाली. सापळा लावून पोलिसांनी भागीरथराम रामलाल बिष्णोई (४६, रा. कोंढवा) याला पकडले. त्याच्याकडून १४ लाख ९८ हजार रुपयांचा अफू, पिशवी, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा असा १५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बिष्णोई याच्याविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!