- भाऊ, पत्नी आळंदी पोलिसांकडून गजाआड
शबनम न्यूज | प्रतिनिधी
चऱ्होलीतील पठारे मळा येथे झालेल्या मेंढपाळाच्या खुनाची उकल करण्यात पोलिसांना यश आले. अनैतिक संबंधातून सख्ख्या भावानेच हा खून केल्याची माहिती मंगळवारी समोर आली आहे.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर आयुक्त सारंग आवाड, उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली घातक शस्त्राने डोक्यावर वार करून खून केल्याचे उघड, सीसीटीव्ही फुटेज तपासले.
गुंडाविरोधी पथक आणि खंडणीविरोधी पथकाने खुनाचा छडा लावला. धनू दादा लकडे (वय ३३) असे खून झालेल्या भावाचे नाव आहे. धनू यांची पत्नी आणि भाऊ सोमनाथ (वय १९, रा. काळे कॉलनी, आळंदी रोड) यांना पोलिसांनी अटक केली आहे. धनू मेंढपाळ होते. चहोली येथे त्यांच्या मेंढ्यांचा कळप आला होता. ५ जुलै रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास प्राईल्ड वर्ल्ड सिटी येथील सेक्युरिटी केबिनसमोरील मैदानात धनू यांचा मृतदेह आढळून आला. घातक शस्त्राने डोक्यावर वार करून त्यांचा खून केल्याचे निदर्शनास आले. धनू यांचा लहान भाऊ सोमनाथ याने या प्रकरणात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल विश्लेषण व तांत्रिक बाबी तपासातून या गुन्ह्याचे गौडबंगाल उघड केले. मृत धनू यांची पत्नी व सोमनाथ यांच्यात अनैतिक संबंध होते. अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरत असल्याने सोमनाथने धनू यांच्या पत्नीशी संगनमत करून त्यांचा खून केल्याचे उघड झाले आहे.