पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते स्वर्गीय दत्ता काका साने यांच्या पाचव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त गोसेवा हीच खरी राष्ट्रीय सेवा या उक्तीप्रमाणे पांजरपोळ गोशाळा भोसरी येथे चारादान उपक्रम शुक्रवार दिनांक 4 जुलै रोजी संपन्न झाले . सामाजिक हितासाठी झटणाऱ्या, कार्याचा ध्यास घेत आयुष्य जगणाऱ्या स्वर्गीय दत्ता काका साने यांच्या स्मृती स्मृतीप्रित्यर्थ गोसेवेचे कार्य संपन्न झाले.
सदर उपक्रम कार्यसम्राट नगरसेवक दत्ता काकासाने प्रतिष्ठान, राजमाता जिजाऊ सहकारी पतसंस्था मर्यादित, वीर अभिमन्यू फ्रेंड सर्कल, साने चौक , समस्त ग्रामस्थ श्रीक्षेत्र टाळगाव चिखली यांच्या वतीने राबविण्यात आले.
यावेळी स्वर्गीय दत्ता काका साने यांचे चिरंजीव तथा राष्ट्रवादी विद्यार्थी सेलचे अध्यक्ष यश साने यांच्यासह साने कुटुंबीय व मित्रपरिवार तसेच टाळगाव चिखलीचे सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.