पिंपरी चिंचवड प्रतिनिधी :
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीने अकरा वर्षे पूर्ण केली त्याबद्दल रविवार दिनांक 6 जुलै रोजी दुपारी तीन वाजता आचार्य अत्रे सभागृह येथे अभिनंदन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये भाजपने अकरा वर्षात केलेल्या विविध विकास कामाबाबत माहिती देण्यात येणार आहे.अशी माहिती पिंपरी चिंचवड शहरातील कलासागर येथे आयोजित पत्रकार परिषदेत भाजपचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष शत्रुघन काटे यांनी दिली.
रविवार दिनांक 6 जुलै रोजी आषाढी एकादशीच्या निमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे यामध्ये विठ्ठल रुक्मिणी प्रतिकृतीची मिरवणूक तसेच जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पवित्र गाथा व ज्ञानेश्वर माऊली यांची ज्ञानेश्वरी या ग्रंथासह विठ्ठल पादुकांची पालखी शेकडो वारकऱ्यांचं भजनी मंडळासह दुपारी एक वाजता दिंडी निघणार आहे.तसेचआषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर संत तुकाराम नगर सहकारी गृह रचना संस्थेच्या ९४१ सदनिका धारकांना व २२ दुकानदार सभासदांना शेअर सर्टिफिकेट वाटप करण्यात येणार आहेया कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी केले आहे.
महेश नगर ,संत तुकाराम नगर, वल्लभ नगर मधील श्री दत्त मंदिर श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर गणेश मंदिर, जगद्गुरु संत तुकाराम महाराज मंदिर ,तुळजाभवानी माता मंदिर, खंडोबा मंदिर, शनि मंदिर, येथून आचार्य अत्रे रंगमंदिर येथे दिंडी पोहोचणार आहे. या भव्य दिव्य दिंडीचे पालखीचे तेथे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात येणार आहे. दिंडीमध्ये सहभागी झालेल्या सर्व भजनी मंडळांचे यथोचित स्वागत झाल्यानंतर त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
या पत्रकार परिषदेत माजी खासदार अमर साबळे,सदाशिव खाडे, माजी नगरसेवक माऊली थोरात भाजपचे सरचिटणीस संजय मंगोडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.