शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी मध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवार (दि. ०४) रोजी दौरा केला. सुप्रिया सुळे हे पुणे शहराच्या दौऱ्यावर होत्या. त्यांनी विविध भागातील रस्त्यांची पाहणी केली, सकाळी साडेआठ वाजल्यापासून त्या पाहणी दौऱ्यावर होत्या..सुप्रिया सुळे यांनी रस्त्याची पाहणी करताना आयटी अभियंत्यांनी त्यांची व्यथा मांडली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी थेट संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून सूचना केल्या.
सुविधांची वानवा होत असल्याने गेल्या काही दिवसांपासून हिंजवडी ग्रामपंचायत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात यावी, ही मागणी चर्चेत होती. याबाबत स्थानिकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया असून आयटी अभियंते यांची यावर ठाम भूमिका आहे. अखेर रस्त्यांवर तुंबलेले पाणी आणि रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था यासाठी खासदार सुप्रिया सुळे या रस्त्यावर उतरल्या असून त्यांनी पाहणी दौरा सुरू केला आहे.
सकाळी साडेआठ पासून सुरू झालेल्या दौऱ्याची सुरुवात फेज वन ते मानगाव रस्त्याची पाहणी सुरुवात केली. त्यानंतर फेज तीन मेट्रो स्टेशन कारशेड जवळील रस्त्याची पाहणी, फेज तीन मेगापोलीस या ठिकाणच्या रस्त्यांची पाहणी, भोईरवाडी रोड या ठिकाणच्या रस्त्यांची पाहणी, फेस दोन मधील मॅकडॉनल्ड्स जवळील रस्त्याची पाहणी आणि मारुंजी रस्ता टी जंक्शन या ठिकाणचे रस्त्याची पाहणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
या पाहणी दौऱ्यानंतर आयटी अभियंत्यांनी रस्त्यावर सातत असलेलं पाणी कचरा आणि रस्त्यांची दुरावस्था यासंबंधी तक्रार खासदार सुळे यांच्याकडे केली हिंजवडी मध्ये काही दिवसांपासून रस्त्यांना नदीचे स्वरूप आलं होतं याबाबत स्वतः सुप्रिया सुळे यांनी देखील लक्ष घातलं होतं आता त्या स्वतः येऊन रस्त्याची पाहणी करून या आयटी हब मधील अभियंत्यांची समस्यांकडे लक्ष देत आहेत .