शबनम न्यूज | प्रतिनिधी
गोरगरीब कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे यांना मंगळवार २ जुलै २०२५ रोजी पत्रकार भवन, पुणे येथे यंदाचा लोकराजे छत्रपती शाहू महाराज पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला!
रिक्षा चालक, फेरीवाले, बांधकाम मजूर, साफसफाई कामगार, घरकाम करणाऱ्या महिला, कागद-कचपत्रा वेचक महिला आणि असंघटित कामगारांसाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि कष्टकरी कामगार पंचायत यांच्या माध्यमातून अथक कार्य करणाऱ्या डॉ. बाबा कांबळे यांच्या सामाजिक योगदानाचा यथोचित सन्मान या सोहळ्यात झाला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर होते, तसेच स्वागत अध्यक्ष लताताई राजगुरू (नगरसेविका) , कार्यक्रमाचे आयोजन महामाता रामामाई भिमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक समिती
मुख्य समन्वयक विठ्ठल दादा गायकवाड यांनी केले.
या वेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे नेते विलास लेले, पिंपरी चिंचवड महानगरपालिका फेरीवाला समिती सदस्य आशा कांबळे, महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहराध्यक्ष मोहम्मद भाई शेख कार्याध्यक्ष विलास पाटील वरिष्ठ उपाध्यक्ष संजय शिंदे ज्येष्ठ सल्लागार कुमार शेट्टी, सचिव अविनाश वाडेकर उपाध्यक्ष प्रवीण शिखरे , संघटक निशांत भोंडवे, संघटक, विल्सन मस्के, अंथोनी फ्रान्सिस अण्णा, आनंद वायदंडे, अमीर हमजा, अल्ला बकश शेख, मध्यवर्ती विभाग अध्यक्ष विजय पाटील व त्यांचे सर्व सहकारी, इतर पदाधिकारी उपस्थित होते.