spot_img
spot_img
spot_img

शेखर चिंचवडे युथ फाऊंडेशन वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरातील शेखर चिंचवडे युथ फाऊंडेशन गेली अनेक वर्ष इयत्ता १०वी आणि १२वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि मार्गदर्शन शिबीर आयोजित करतात. याही वर्षी ग.दि. माडगूळकर नाट्यगृहात गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला, सदर सन्मान चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. 

याप्रसंगी प्रसिद्ध वक्ते प्रा.डॉ. विनोद बाबर सर तसेच शिक्षण मंडळाचे मा. सभापती नाना शिवले सर यांनी विद्यार्थ्यांना आगामी शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरक मार्गदर्शन केले. तसेच, सर्व विद्यार्थी व पालकांशी संवाद साधत विद्यार्थी व बालकांचा सन्मान करून पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. याप्रसंगी हा स्तुती उपक्रम राबविल्याबद्दल शेखरअण्णा चिंचवडे यांचे मनापासून कौतुक केले.

यावेळी करुणाताई चिंचवडे, सचिन चिंचवडे, नामदेव ढाके, तात्या आहेर, बिभीषण चौधरी, कविताताई दळवी, पल्लवीताई मारकड, दिलीप गडदे, तृप्तीताई मोरे, वीणाताई कुटे, शशिकांत पाटील, निलेश भोंडवे, निलेग मरळ, ह.भ.प. दत्ताभाऊ चिंचवडे, कुंदाताई गडदे, संदीप शिवले, संदीप चिंचवडे, आबासाहेब पडवळ, नाना शिवले, सुधीर चिंचवडे, तानाजी चिंचवडे, हाके सर तसेच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!