शबनम न्यूज | प्रतिनिधी
स्वस्तात तांबे विक्रीच्या आमिषाने व्यावसायिकाची ४८ लाख ७२ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका व्यावसायिकाने पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारदार व्यावसायिक तरुण पर्वती भागात राहायला आहे.
एप्रिल महिन्यात त्यांनी एका वेबसाइटवर स्वस्तात दक्षिण आफ्रिकेतून तांबे मिळवून देऊ, असा मेसेज पाहिला होता. या मेसेजमध्ये संपर्क क्रमांक देण्यात आला होता. त्यानंतर, व्यावसायिकाने संबंधित क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर, त्याला २५ टन तांबे देण्याचे आमिष दाखवून चोरट्यांनी जाळ्यात ओढले. व्यावसायिकाला एका बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले.