शबनम न्यूज | प्रतिनिधी
कात्रज भागात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशी महिलांनी भारतीय पासपोर्ट, पॅनकार्ड, आधारकार्ड मिळवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बांगलादेशी महिलांसह तिघांना आंबेगाव पोलिसांनी अटक केली. लिझा मकबूल शेख उर्फ खातून तस्लीमा मोफीजूर रेहमान (३०), रिंकीदेवी उर्फ खातून तमीना मकबूल मोरल (३८, दोघी सध्या रा. सिद्धिविनायक सोसायटी, आंबेगाव बुद्रूक, कात्रज, मूळ रा. बांगलादेश) आणि प्रमोदकुमार चौधरी (रा. फतेहपूर, नालंदा, बिहार) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापूर्वी पुणे, मुंबई, ठाणे परिसरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल : घराच्या तपासणीत पथकाला सापडले बांगलादेशी पासपोर्ट नागरिकांना पोलिसांनी पकडले होते. बांगलादेशी नागरिकांविरुद्ध पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.
आंबेगाव बुद्रुक परिसरात बांगलादेशी महिला वास्तव्यास असल्याची माहिती पोलिस कर्मचारी सागर नारगे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने लिझा आणि रिंकीदेवी राहत असलेल्या सदनिकेवर छापा टाकला. पोलिसांनी चौकशी केली, तेव्हा दोघींनी भारतीय पासपोर्ट दाखवले. त्यांच्या घराची तपासणी करण्यात आली असता, बांगलादेशी पासपोर्टही सापडले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन चोरमोले, उपनिरीक्षक युवराज शिंदे, नीलेश जमदाडे यांनी ही कारवाई केली.