spot_img
spot_img
spot_img

एस. बी. पाटील यांच्या जयंती निमित्त पीसीसीओईआर येथे रक्तदान शिबिर संपन्न

शबनम न्यूज | पिंपरी
एका माणसाने केलेले अवयव दान हे ८ व्यक्तींचे जीवन वाचवू  शकते. अवयव आणि रक्त हे आपण कृत्रिमरित्या तयार करू शकत नाही. अवयव दान आणि रक्तदान हे जीवनदान सारखे आहे. याचे प्रमाण वाढले तर हजारो गरजू रुग्णांना मदत होईल. आता अवयव दान आणि रक्तदान हे उपक्रमाऐवजी चळवळ म्हणून चालवली पाहिजे. यासाठी नागरिकांनी व सामाजिक संस्था संघटनांनी जनजागृती करावी असे आवाहन डॉ. स्नेहल गायकवाड यांनी केले.
   पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) रावेत येथील पीसीसीओइआर येथे श्री. शंकरराव बाजीराव पाटील यांच्या जयंतनिमित्त राष्ट्रीय सेवायोजना अंतर्गत रक्तदान शिबिर व अवयव दान या विषयावर डॉ. स्नेहल गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. 
    यावेळी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात १६२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. पीसीसीओइआरचे प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना प्रकल्प अधिकारी डॉ. महेंद्र साळुंके, ससून रुग्णालयातील अधिकारी किरण ठाकरे, डॉ. श्रद्धा वर्मा हे उपस्थित होते. 
     एनएसएस स्वयंसेवकांनी,  प्राध्यापकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. पीसीसीओइआरचे मुख्याध्यापक डॉ. हरीश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेण्यात आले.
      पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी रक्तदात्यांचे अभिनंदन केले.
     डॉ. महेंद्र साळुंके यांनी स्वागत केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!