शबनम न्यूज | प्रतिनिधी
शहरातून श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे रविवारी (२२ जून) प्रस्थान झाले. पुणे-सोलापूर रस्त्यावर रविवारी सकाळी पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. पालखी सोहळ्यात दोन भाविकांकडील मोबाइल संच चोरट्यांनी लांबविल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावर घडली. याप्रकरणी वानवडी आणि हडपसर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शिवम कमलेश पांडे (वय २६, रा. सुयोग अपार्टमेंट, ओैंध) हे पुणे-सोलापूर रस्त्यावर भैरोबा नाला परिसरात सकाळी पावणेनऊच्या सुमारास दर्शनासाठी थांबले होते. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेत असताना चोरट्यांनी त्यांच्याकडील दहा हजारांचा मोबाइल संच लांबविला. मोबाइल चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर पांडे यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस हवालदार गाढवे तपास करत आहेत.