spot_img
spot_img
spot_img

हिंजवडीतील नैसर्गिक नाले बुजविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

शबनम न्यूज | प्रतिनिधी
आयटीनगरी हिंजवडीतील अनेक नैसर्गिक नाले बांधकाम व्यावसायिक, कंपनी मालकांनी बुजविले आहेत. काही नाले वळविले आहेत. नियमांचा भंग करुन बांधकामे केली आहेत. मैला मिश्रित पाणी ओढ्यात सोडले जाते. त्यामुळे हिंजवडीतील रस्ते जलमय होत आहेत. त्यासाठी नैसर्गिक नाले बंद करणाऱ्या, वळविणाऱ्या बांधकाम व्यावसायिक, कंपनी मालकांवर गुन्हे दाखल करण्याची सूचना शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना दिल्या.  
हिंजवडी वाहतूककोंडी व नाल्यांच्या समस्यांसाठी खासदार बारणे यांनी गुरुवारी पीएमआरडीए, एमआयसीडी, प्रदूषण महामंडळा च्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. आमदार शंकर मांडेकर, पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे, अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, पीएमआरडीएच्या मुख्य अभियंता रिनाज पठाण, एमआयडीसीचे मुख्य अभियंता  नितीन वानखेडे, सहाय्यक आयुक्त दीप्ती सूर्यवंशी,   हिम्मत खराडे,  श्वेता पाटील, अधीक्षक अभियंता  योगेश कुलकर्णी, टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडचे प्रोजेक्ट डायरेक्टर अमल भट्टाचार्य तसेच स्थानिक पातळीवरील प्रतिनिधी म्हणून नंदू भोईर, तात्या पारखी, अमोल नलावडे, किरण राऊत व माण ग्रामस्थ बैठकीस उपस्थित होते.
खासदार बारणे म्हणाले, आयटीनगरी हिंजवडीत कामासाठी जाणारे नागरिक पिंपरी-चिंचवड शहरात वास्तव्यास आहेत. वाकड, थेरगाव, पिंपळेसौदागर, रहाटणीत वास्तव्यास आहेत. या नागरिकांना हिंजवडीला जाण्यासाठी विविध अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. हिंजवडीत पाणी साचत असल्याने वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागत आगे. बांधकाम व्यावसायिक, खासगी कंपन्यांनी हिंजवडीतील  नैसर्गिक नाले बुजविले आहेत. अनेक नाले वळविले आहेत. मैला मिश्रित पाणी ओढ्यात सोडले जाते. त्यामुळे पावसाचे पाणी जाण्यास मार्गच नाही. पाण्याचा निचरा होत नाही. परिणामी, पाणी रस्त्यावर साचून राहते. रस्ते जलयम होत आहेत. मुळातच रस्ते अरुंद आहेत. त्यात महा मेट्रोचे काम सुरु आहे. त्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. अभियंत्यांना कोंडीचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर अनधिकृत बांधकामे झाली आहे. फुटपाथ गिळंकृत केले आहेत. त्यामुळे या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी. रस्ते मोकळे करावेत. नाळे बुजविणे, वळविणे आणि रसायनमिश्रित पाणी सोडणाऱ्या कंपन्या, बांधकाम व्यावसायिकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश खासदार बारणे यांनी अधिकाऱ्यांना दिले. तातडीच्या उपाययोजना राबविण्यात याव्यात. संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून अंमलबजावणी करण्यावर भर द्यावा अशाही सूचना खासदार बारणे यांनी दिल्या.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!