spot_img
spot_img
spot_img

मला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच शहर नेतृत्व करण्याची संधी द्यावी – देवेंद्र तायडे

शबनम न्यूज , प्रतिनिधी : मला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच शहर नेतृत्व करण्याची संधी द्यावी अशी मागणी पक्षाचे कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी शरद पवार यांच्याकडे भर सभेत केली आहे.

राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षपदी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माझी निवड केली व निवड करताना सामाजिक समीकरण असावं असं त्यामागील उद्देश होता परंतु माझी कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर या शहरातील शहराध्यक्ष तुषार कामटे यांनी माझ्या जोडीला आणखी तीन जणांना कार्याध्यक्ष पद दिले ,मी कार्याध्यक्ष असताना माझ्यासोबत आणखीन दोन-तीन कार्य अध्यक्ष पद देणं यामागचं कारण मला आतापर्यंत समजलं नाही अशी खंत पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यअध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी व्यक्त केली.

शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाचा कार्यकर्ता मेळावा मंगळवारी ताथवडे येथील सिल्वर बँकेट हॉल येथे संपन्न झाला.याप्रसंगी देवेंद्र तायडे बोलत होते.

तायडे यांनी पुढे सांगितले कि संघटनात्मक काम करताना दिशा देणार नेतृत्व पाहिजे ,कोणताही , हुकूमशाही नेतृत्व नसावं , प्रत्येक कार्यकर्त्याला दिशा दिली पाहिजे, चुकत असेल तर त्याला योग्य दिशेवर आणणार नेतृत्व पाहिजे, आणि जो कोणी विरोध करत असेल तर त्याचं ऐकूनही घेतलं पाहिजे,असे तायडे यांनी सांगितले

मी चळवळीतला कार्यकर्ता आहे मागील पंधरा सोळा वर्षापासून मी सामाजिक कार्यात कार्यरत आहे त्यामुळे कार्यकर्त्याला कसं सोबत घ्यायचं व संघटना कशी वाढवायची याचे मला ज्ञान आहे. आणि त्या दृष्टिकोनातूनच मला जयंत पाटील यांनी आपल्या पक्षाचं शहरातील कार्याध्यक्ष पद दिले पण मला पक्षाच्या शहराध्यक्षांनी कधीच विचारात घेतलं नाही, हे कुठेतरी थांबलं पाहिजे, संघटनेचे जर आपण काम करत असाल तर सर्व कार्यकर्त्यांना सोबत घ्यायला हवं.

गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर शहरांमध्ये आपल्या पक्षाचे संघटनात्मक काम झालेलं नाही, त्यामुळे आता पिंपरी चिंचवड शहरातील आपल्या पक्षाच नेतृत्व बदलावं. नेतृत्व पवार साहेबच ठरवणार पण मला असं वाटतं की आता बस झालं आपल्या शहराचा शहराध्यक्ष बदलावं, माझी विनंती राहील की पवार साहेबांनी असं नेतृत्व द्यावं की त्या नेतृत्वाने सर्वांना सोबत घेऊन जावं, पक्ष वाढवावं सर्वांना सोबत घेऊन निर्णय घ्याव.

तसेच या शहराचे नेतृत्व करण्याची संधी मला मिळावी अशी मागणी तायडे यांनी केली . माझ्याकडे सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचे गुण आहे.माझ्याकडे फुले, शाहू ,आंबेडकर, विचारांचा वारसा आहे त्यामुळे मी पक्षाचं काम सक्षमपणे करू शकतो. तसेच पक्षाची एक कोअर टीम असावी जी महत्वाची निर्णय घेण्यासाठी कार्यकर्त्यांना सहायक असेल अशी मागणी देवेंद्र तायडे यांनी आपल्या भाषणात केली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!