spot_img
spot_img
spot_img

औक्षण करून केले विद्यार्थ्यांचे स्वागत

शबनम न्यूज | प्रतिनिधी

क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव अंतर्गत अनुदानित आश्रमशाळेतील इयत्ता पहिली ते दहावीच्या वर्गातील नवोदित विद्यार्थ्यांचे विधिवत औक्षण करून ‘प्रवेशोत्सव’ साजरा करण्यात आला. घोडेगाव येथील आदिवासी विकास प्रकल्पाच्या कार्यालयीन अधीक्षक सुजाता गायकवाड, आदिवासी विकास प्रकल्प निरीक्षक शरद काळे, सामाजिक कार्यकर्ते शिवराज शिंदे, उदय देशपांडे, क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, प्रधानाचार्य पूनम गुजर, वर्गशिक्षका स्वप्ना झिरंगे, सतीश अवचार यांची उपस्थिती होती.

अखंड भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. प्रास्ताविकातून गिरीश प्रभुणे यांनी गुरुकुलम् मधील शिक्षणाचे महत्त्व तसेच गुरुकुलम् मध्ये राबविण्यात येणारे उपक्रम याविषयी माहिती दिली. सुजाता गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि सर्वांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. शिवराज शिंदे यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. नवोदित विद्यार्थ्यांचे विधिवत औक्षण करण्यात आले. यावेळी गुरुकुलम् मधील विद्यार्थिनींने उपनिषदातील ऋचांचे पठण केले. त्यानंतर विद्यार्थ्यांवर विद्याव्रत ग्रहण संस्कार करण्यात आला.

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग असलेल्या नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते प्रत्येक विद्यार्थ्यांला दप्तर, पाठ्यपुस्तकं आणि शालेय साहित्य प्रदान करण्यात आले. या आनंद सोहळ्यानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना मिष्टान्नाचे वाटप करण्यात आले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!