शबनम न्यूज , प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड : लोकसभा व विधानसभा निवडणुकीत युवक शहराध्यक्ष या नात्याने मी प्रामाणिकपणे काम केल आहे. तसेच लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीतील शिवसेना पक्षाच्या कामापेक्षा युवक संघटनेने जास्त काम केलं असल्याची माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवक शहराध्यक्ष इमरान शेख यांनी दिली.
पक्षाने दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडत आहे. राष्ट्रवादीचे दोन राष्ट्रवादी झाल्यानंतर अनेकांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची साथ सोडली परंतु मी साथ सोडली नाही. मी राष्ट्रवादीचा युवक शहराध्यक्ष म्हणून नेहमीच पक्ष बांधणीचं काम केलं, पक्ष वाढविण्याचे काम केलं,, युवकांना जोडण्याचं काम केलं ,या पिंपरी चिंचवड शहरात सर्वांनीच राष्ट्रवादीची साथ सोडली परंतु मी आपल्या राष्ट्रवादी सोबत राहून राष्ट्रवादी पक्ष वाढविण्याचे काम सुरूच ठेवलं असं आपल्या भाषणात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवक शहराध्यक्ष इमरान शेख यांनी सांगितलं
पिंपरी चिंचवड शहरात मंगळवारी ताथवडे परिसरातील सिल्वर बँकेट हॉल येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. यावेळी युवक शहराध्यक्ष इमरान शेख बोलत होते.
मी नेहमी पवार साहेबांच्या विचारा सोबत राहिलो, मी अनेक युवकांचे कार्यकर्ते मेळावे घेतले व दाखवून दिले की पिंपरी चिंचवड शहरात शरद पवार यांच्या विचारांना मानणारा वर्ग मोठा आहे व हा वर्ग आमच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष सोबत आहे.
भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या माजी नगरसेविका प्रियंका ताई बारसे, रहाटणी परिसरातील माजी नगरसेवक मच्छिंद्र तापकीर यांना पक्षात घेण्याचं काम आम्ही केलं. पक्षाचा युवक अध्यक्ष म्हणून आम्ही आमचं काम सुरूच ठेवलं ,मेळावे घेतले पक्षाचे कार्यक्रम राबविले ,पक्ष वाढवत राहिलो.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी कोणताही नगरसेवक नसताना, तसेच विरोधी पक्षात महेश लांडगे व अजित गव्हाणे असताना खासदार अमोल कोल्हे यांच्या निवडणुकीच काम आम्ही प्रामाणिकपणे केलं फक्त आणि फक्त युवक व महिला पदाधिकाऱ्यांच्या जोरावर आम्ही सर्वांनी खासदार अमोल कोल्हे यांचा प्रचार केला. दिवस रात्र आम्ही रक्ताचं पाणी केलं आणि अमोल कोल्हे यांच्या प्रचारात महाविकास आघाडीतील शिवसेनेपेक्षा जास्त काम आमच्या युवक संघटनेने केलं याचा मला अभिमान वाटतो असं इमरान शेख यांनी आपल्या भाषणात सांगितले.
विधानसभा निवडणुकीत हि जागोजागी आम्ही आपले उमेदवार राहुल कलाटे यांच्यासाठी बूथ निर्मिती करून युवक संघटनेन काम केलं राहुल कलाटे यांच्या प्रचार प्रामाणिकपणे केला.पक्षाने दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडली आहे असे इमरान शेख यांनी आपल्या भाषणात सांगितले.