spot_img
spot_img
spot_img

जिथे कधी विद्यार्थी होते, तिथे आज आमदार म्हणून स्वागतासाठी उभे राहिले ; अमित गोरखे यांची भावनिक भेट!

  • मनपा शाळेचे माजी विद्यार्थी आमदार अमित गोरखे यांचे आपल्या शाळेत विशेष स्वागत

शबनम न्यूज | प्रतिनिधी

आमदार अमित गोरखे यांनी स्वतः शिकलेल्या मनपा शाळेत नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांचे स्वागत करत त्यांच्या आयुष्यातील एक भावनिक व प्रेरणादायी क्षण अनुभवला. शासनाच्या ‘१०० शाळांना भेट’ या अभिनव उपक्रमांतर्गत निवड झालेल्या “स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यामंदिर, काळभोर नगर” मनपा शाळेला भेट देण्यासाठी आमदार अमित गोरखे उपस्थित होते. या निमित्ताने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी आपल्या शालेय आठवणींना उजाळा दिला.
“ही तीच शाळा आहे, जिथे मी विद्यार्थी म्हणून बसलो होतो, शिकलो होतो, घडलो होतो. आज आमदार म्हणून या शाळेत परत आलो, हे माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद व भावनिक क्षण आहे,” अश्या भावना त्यांनी व्यक्त केल्या

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी एक प्रेरणादायी कथा सांगितली,  “प्रत्येकाच्या आत एक सिंह दडलेला असतो.आपण आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवला पाहिजे. संधी मिळाल्यावर ते सामर्थ्य दाखवा  कारण तुम्ही तुमचं भविष्य घडवू शकता!”
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि शिकण्याची ऊर्जा पाहून समाधान व्यक्त करत त्यांनी शिक्षणाच्या गुणवत्तेबाबत काही महत्त्वाचे मुद्दे मांडले:

राज्य शासनाकडून सर्व शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण आणि पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत.
शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना जीवनघडवणारे शिक्षण द्यावे, हे आपले कर्तव्य आहे. तसेच, ‘१० कोटी वृक्षारोपण’ या राज्य शासनाच्या उपक्रमाची माहिती देत त्यांनी विद्यार्थ्यांना कमीत कमी एका वृक्षाची लागवड व संगोपन करण्याचे आवाहन केले.
यामुळे पर्यावरण विषयक सकारात्मक संस्कार विद्यार्थ्यांवर लहानपणापासून होतील, असे ते म्हणाले. या भावनिक आणि प्रेरणादायी भेटीत अनेक माजी विद्यार्थी आणि शाळेचे शिक्षक उपस्थित होते.

त्यामध्ये  मुख्याध्यापिका पाटकर मॅडम, रजिया खान, निवेदिता घाटगे, केदार सर, तसेच माजी विद्यार्थी  व मान्यवर  दिलीप दातीर पाटील, दत्ताभाऊ देवतारासे, राजूभाऊ दुर्गे,  विशाल काळभोर,
वैशाली काळभोर घाडगे मॅडम, वेर्लेकर महाडू, मारुती भापकर, गणेश लंगोटे जी उपस्थित होते.

“शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे  हे गुरगुरल्याशिवाय राहणार नाही!” या त्यांच्या वक्तव्यानं उपस्थितांमध्ये उत्साह आणि प्रेरणा निर्माण झाली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!