spot_img
spot_img
spot_img

पिंपळे सौदागर येथील विद्यालयात शालेय प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

16 जून..शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस..यानिमित्त पिंपळे सौदागर येथील प्राथमिक शाळा क्रमांक 51 येथे मा. विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते विद्यार्थ्याना फुले देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी आयोजित प्राथमिक शाळेतील मुलांचे पहिले पाऊल या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाची मा .विरोधी पक्षनेते श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली.

तसेच विठ्ठल उर्फ नाना काटे हस्ते प्रथम दिवसाचे आकर्षण असणारी शालेय पाठयपुस्तकांचे व शालेय वस्तूंचे किट तसेच गणवेश वाटप यावेळी विद्यार्थ्यांना करण्यात आले. याप्रसंगी पालिकेच्या संगणक विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता मा. नीलकंठ पोमन साहेब,मुख्याध्यापिका श्रीमती सुरेखा गेंगजे मॅडमबालवाडीच्या पर्यवेक्षिका मा. खंडागळे मॅडम ,आकांशा फौंडेशन चे सदस्य ,उद्योजक सोमनाथ खेडेकर व सर्व शिक्षक वृंद तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व समिती सदस्य, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!