शबनम न्यूज | प्रतिनिधी
घरकुल मध्ये काल एक मोठी आगीची दुर्घटना घडली. रात्रीच्या 9 :00 ते 9:30 यादरम्यान इमारत डी 34, मोरया धाम सोसायटी घर क्रमांक 604 रफिक कुरेशी दापत्य यांच्या घरामध्ये शॉर्टसर्किटेक मुळे मोठी आग लागली. त्यामुळे त्यांच्या घराच फार मोठे नुकसान झालं. काही क्षणात सर्व काही होत्याचं नव्हतं झालं .
कुरेशी दापत्यांना फार मोठा मानसिक धक्का बसला आपल्या डोळ्यासमोर आपलं घर जळत असताना त्यांची झालेली अवस्था दुःख घरकुल मधील सामाजिक कार्यकर्ते यांना देखावले नाही.आपल्या घरकुल कुटुंबातील एक व्यक्ती एक कुटुंब अडचणीत आहे अशी भावना समजून जशी जमेल तशी मदत करणे कामे. दुर्घटनेला काही तास उलटताच . लगेचच एक हात मदतीचा पुढे करत कुरेशी कुटुंबियांना आर्थिक स्वरूपाची मदत करण्याकरिता आमदार महेश दादा लांडगे यांच्या मार्गदर्शना खाली सामाजिक कार्यकर्ते सौ.कीर्ती ताई मारुती जाधव युथ फाऊंडेशन यांच्यावतीने पुढे करण्यात आला. व कुरेशी कुटुंबीयांना आर्थिक स्वरूपात मदत करून कुरेशी कुटुंबीयाला आर्थिक हातभार लावला.
त्याकरता घरकुल मधील काही सामाजिक कार्यकर्ते त्यावेळेस उपस्थित होते. मारुती जाधव, शांताराम खुडे, राजाभाऊ जाधव, दशरथ शिंदे, कुणाल पळसकर, दत्ता धर्मे, अक्षय ओहोळ, संतोष माळी, सुदाम जाधव,तेजस कडलक, पोपट आरणे, धर्मे काकू, तसेच संपूर्ण कुरेशी कुटुंबीय यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.